Marathi Blog – Aayuttam – Ayurvedic Clinic https://aayuttam.com Fri, 26 Jul 2024 05:27:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://aayuttam.com/wp-content/uploads/2024/04/cropped-favicon-op-32x32.webp Marathi Blog – Aayuttam – Ayurvedic Clinic https://aayuttam.com 32 32 बस्ती पंचकर्मामागील शास्त्रीय विचार काय आहे ? – Blog – 57 https://aayuttam.com/blog/%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d/ Fri, 26 Jul 2024 05:27:24 +0000 https://aarogyamayurvedicclinic.com/?p=3953 मागील ब्लॉग मध्ये आपण पंचकर्म, त्याचे प्रकार आणि वमन, विरेचन या कर्माबद्दल माहिती घेतली. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बस्ती चिकित्सा बद्दल माहिती घेणार आहोत.

बस्ती चिकित्सा म्हणजे काय ?

बस्ती चिकित्सा म्हणजे सामान्यपणे एनीमा म्हणजे पोट साफ करणारे औषध असं मानलं जात कारण पोट साफ झालं की बरं वाटतं.

पण तसे नाही आहे .

बस्ती चिकित्सेमागे खूप महत्वपूर्ण शास्त्रीय विचार आहे.

आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेला “अर्धी चिकित्सा” मानली आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला बरं करण्यासाठी बस्ती चिकित्सा दिली तर ५० टक्के गुण फक्त बस्ती चिकित्सेने मिळतो आणि उरलेल्या ५० टक्के गुणासाठी इतर पंचकर्म, औषध, आहार, व्यायाम यांची योजना करावी लागते.

जर आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेला इतके महत्व दिले आहे तर त्यामागील शास्त्रीय विचार अत्यंत महत्वपूर्ण असणार.

चला तर मग जाणून घेऊया बस्ती कर्मामागील शास्त्रीय विचार.

त्यासाठी पहिले आपल्याला आपल्या पचन संस्थेबद्दल थोडीशी माहिती करून घ्यावी लागणार. आहे.

आपण जे अन्न खातो त्याचे पचन तोंडात सुरू होते. त्यानंतर ते अन्न खाली पोटात म्हणजे Stomach आणि जठर म्हणजे Liver कडे जाते , या अवयवांमधून विविध स्त्राव अन्नात मिसळले जातात आणि जेव्हा ते अन्न आतड्यामध्ये जाते तेव्हा त्यातून पोषक अंश रक्तात शोषून घेतले जातात आणि मग ते पोषक अंश रक्ताद्वारे पूर्ण शरीरात जाऊन शरीराला पोषण देतात.

तर इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची ही आहे की रक्तात जो पोषक अंश आतड्या मधून शोषला जातो . ह्याच ज्ञानाचा आयुर्वेदाने सुंदररित्या बस्ती चिकित्सेत उपयोग केलेला आहे.  त्या ऋषींना शतश: नमन. 

औषध रक्तात लगेच शोषले गेले पाहिजे.औषधाला अन्न मार्गातून जाण्याची काही आवश्यकता नसते, तीन तासांचा वेळ वाचतो. त्यामुळे आयुर्वेदात बस्ती चिकित्सेद्वारे औषध, काढे, तूप हे आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडली जातात. आतड्याचे काम आहे औषध लगेच रक्तात शोषून घेणे आणि त्यामुळे सेकंदात औषध रक्तात जाऊन त्याचे काम सुरू करते .तर बस्ती म्हणजे फक्त पोट साफ करणारे औषध नाही, तर

म्हणजे बस्ती चिकित्सा ही जुन्या काळाची Emergency Services म्हणजे अत्यायिक चिकित्सा होती असे आपण म्हणू शकतो. से आज काल आपण नसेमधून मधून रक्तात लगेच औषध सोडतो तसं त्या काळी बस्ती चिकित्सेद्वारे औषध आतडयात सोडून सेकंदात ते रक्तात शोषले जात असे.

आश्चर्यचकित झाला ना .. जाणून.. कि बस्ती चिकित्सेमागे आयुर्वेदाचा इतका मोठा गहण विचार आहे.

आयुर्वेद हे एक शास्त्र आहे हे लक्षात घ्या , आपल्या बुद्धीला त्याच्या मागचे शास्त्र , सिद्धांत समजत नसतील तर त्याला नावे ठेवू नका किंवा ते चुकीच आहे असे मानू नका. त्याच्यापेक्षा त्याच्या मागे काय शास्त्रीय विचार असेल ह्याच अभ्यास करून शोध घ्या .

आपल्या आयुर्वेद शास्त्राबद्दल आदर बाळगा. कारण

आयुर्वेदिक शास्त्राचा प्रत्येक सिद्धांत = सिद्ध + अंत म्हणजे ते सत्य आहे आणि ते सत्य सिद्ध केलेले आहे आणि त्याच्या पुढे सिद्ध करण्यासाठी काही उरले नाही …..अंत आहे. त्याच्यापुढे त्याच्यात बदल नाही ह्याला सिद्धांत म्हणतात.

हा ब्लॉग जास्तीत जास्त फॉरवर्ड करा म्हणजे आयुर्वेदाच्या मागचे सिद्धांत लोकांना कळतील. हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे कमेंट कळवा आणि पुढील ब्लॉग मध्ये आपण बस्तीचीचे विविध प्रकार त्याचे उपयोग यांच्याबद्दल माहिती करून घेऊया.

Stay Healthy, Stay blessed.

]]>
पंचकर्म म्हणजे काय? (Marathi Blog No – 03) Blog – 54 https://aayuttam.com/blog/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-marathi-blog-no-03-blog-54/ Fri, 05 Jul 2024 05:23:01 +0000 https://aarogyamayurvedicclinic.com/?p=3867 पंचकर्म, पंचकर्म, पंचकर्म….आज काल आपण सगळीकडे ऐकतो कि पंचकर्म म्हणजे तेलाने मसाज, पंचकर्म म्हणजे जुलाब, उलट्या वगैरे.

पण पंचकर्म म्हणजे नेमके काय ?

चला मग जाणून घेऊन आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये ‘पंचकर्म म्हणजे काय ?

पंचकर्म –

पंच म्हणजे ५ आणि कर्म म्हणजे क्रिया.

पंचकर्म म्हणजे अश्या ५ क्रिया ज्याने शरीराची शुद्धी होते किंवा शरीराला ताकत मिळते.

  • शरीरशुद्धी पंचकर्ममध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो

1. वमन

2. विरेचन

3. बस्ती

4. नस्य

5. रक्तमोक्षण

  • शरीराला ताकत देण्याऱ्या पंचकर्ममध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो –    

1. स्नेहन

2. स्वेदन

3. नस्य

4. शिरोधारा

5. बस्ती

नस्य आणि बस्ती यांचा दोन्ही पंचकर्ममध्ये समावेश होतो कारण नस्य आणि बस्ती ह्या कर्मासाठी ज्या प्रकारचे तेल, तूप, काढे वापरले जातात त्यानुसार त्यांनी शरीरशुद्धी होते किंवा शरीराला ताकत मिळते हे ठरते . त्यामुळे त्यांचा दोन्ही पंचकर्मात समावेश होतो.

पहिले जाणून घेऊया शरीरशुद्धी पंचकर्माबद्दल

वमन व विरेचन

कालावधी – वमन व विरेचन या शरीरशुद्धी क्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो.

शास्त्र – या क्रियेमध्ये तुमची पचन शक्ति ही शरीरशुद्धीसाठी वापरली जाते. त्यामुळे ‘जगण्यापूरते खाणे’ हा मंत्र १५ दिवस पाळवा लागतो . म्हणजे या शरीरशुद्धी क्रियेमध्ये पचनशक्तिला त्याच्या नेहमीच्या पचनक्रियेपासून विश्रांती द्यावी लागते आणि त्या पचनशक्तिचा शरीरशुद्धीसाठी वापर करायचा असतो हा येथे हेतू असतो .

विधी –  वमन/विरेचन विधी हा चार विभागात विभागला जातो.

  1. स्नेहपान
  2. प्रधान कर्म
  3. संसर्जन क्रम
  4. अपुनर्भव चिकित्सा

1. स्नेहपान – वाढत्या प्रमाणात औषधी तूप सेवन करणे.

हा विधी साधारण ५ ते ६ दिवस चालतो. ह्या क्रियेमध्ये वाढत्या प्रमाणात औंषधी तूप पिण्यास देतात . वाढत्या प्रमाणात म्हणजे पहिल्या दिवशी  ४ चमचे, दुसऱ्या दिवशी ८ चमचे मग १२, १६ असे. तूप पिल्यावर गरम पाणी पित राहणे आणि जेव्हा तूपाचे ढेकर यायचे बंद होतील, म्हणजे तूप पचले आहे. त्यानंतर तहाण लागेल तेव्हा गरम पाणी पिणे आणि भूक लागेल तेव्हा मूग आणि भाताची खिचडी खाणे हा सर्वसामान्य विधी असतो.

या औषधी तूपामुळे आपल्या शरीरातील आम (टॉक्सिन्स) पातळ होतो.

त्यानंतर स्नेहन म्हणजे मसाज आणि स्वेदन म्हणजे स्टीमबाथ दिली जाते .

स्नेहन व स्वेदन-इथे स्नेहन व स्वेदनामुळे शरीरातील पातळ झालेला आम (टॉक्सिन्स) शरीराच्या मध्य भागी आणणे हा उदेशअसतो. ज्याप्रमाणे आपण घराची साफ सफाई केल्यावर कचरा खाली पडतो मग आपण तो कचरा गोळा करतो आणि नंतर बाहेर फेकतो. त्याप्रमाणे स्नेहपान क्रियेमुळे शरीरातले आम (टॉक्सिन्स) पातळ झाल्यावर स्नेहन स्वेदन कर्मामुळे सर्व आम (टॉक्सिन्स) शरीरातील मध्यभागी आणला जातो.

2. प्रधान कर्म –

स्नेहन आणि स्वेदनकर्म झाल्यानंतर जेव्हा हा आम (टॉक्सिन्स) उलटी द्वारे बाहेर काढला जातो तेव्हा त्या कर्मास वमन कर्म असे म्हणतात आणि जर हा आम (टॉक्सिन्स) जुलाबांद्वारे बाहेर काढला जातो तेव्हा त्या कर्मास विरेचन असे म्हणतात.

3. संसर्जन कर्म –

हा विधी १० व्या दिवसापासून १५ व्या दिवसापर्यंत असतो. उपवास सोडताना जसे आपण पहिले हलके अन्न खातो व नंतर हळूहळू जड अन्न खाण्यास सुरुवात करतो त्याप्रमाणे वमन आणि विरेचन या विधीत आपला एकप्रकारे उपवासच होतो. त्यामुळे प्रधान कर्मानंतर आपण हळुहळु हलके अन्न खाण्यास सुरुवात करतो जसे पहिल्या दिवशी भाताची पेज, नंतर मऊ भात, मग खिचडी, भाकरी. असे हळु हळु पचनास जड पदार्थ क्रमाने खाण्यास सुरुवात करतात म्हणून या विधीस संसर्जन क्रम असे म्हणतात .

अपुनर्भव चिकित्सा –

अपुनर्भव म्हणजे ‘आजार परत होऊ नये म्हणून करावयाची चिकित्सा’ म्हणजे Preventive treatment. या विधीमध्ये पंचकर्म शरीरशुद्धी झाल्यावर शरीराला ताकत देण्यासाठी व परत आजार होऊ नये म्हणून पुढे १५ दिवस औषधे ,औषधी तूप , रसायन कल्प दिले जातात , ज्यांचा सेवनाने आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्याला आजार होत नाही.

वमन आणि विरेचन कधी करावे ?

निरोगी व्यक्तीनी वसंत ऋतु मध्ये म्हणजे फेब्रुवारी/मार्च मध्ये वमन करून घ्यावे आणि शरद ऋतुमध्ये म्हणजे सप्टेंबर /ऑक्टोबर मध्ये विरेचन कर्म करून घ्यावे.

आजारी व्यक्तीनी पंचकर्म कधी करावे?

ज्यांना आजार असेल त्यांनी वैद्याच्या सल्यानुसार आणि आजाराच्या गांभीर्यानुसार वर्षभरात कधीही वमन किंवा विरेचन हे कर्म करून घ्यावे.

वमन/विरेचन कर्मापैकी कोणते कर्म कोणी करावे?

त्यासाठी सुद्धा वैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तरी ढोबळ मानाने कफ प्रकृतीच्या लोकांनी आणि ज्यांना कफाचे आजार आहेत जसे जुनाट सर्दी, खोकला, दमा, स्रावी त्वचारोग, स्थौल्य, थाईरॉईड, मधुमेह आदि त्यांनी वमन कर्म करून घ्यावे आणि ज्या लोकांची प्रकृती पित्ताची आहे आणि ज्यांना पित्ताचे आजार आहेत जसे डोकेदुखी, एसिडिटी, गॅसेस,पचनाचे विकार, पाळीच्या तक्रारी, त्वचारोग आदि अशा लोकांनी विरेचन कर्म करून घ्यावे .

वर्षातून किती वेळा पंचकर्म करावे?

घराची साफसफाई जशी आपण वर्षातून एकदा करतो त्याप्रमाणे वर्षातून एकदा वमन किंवा विरेचन कर्म आपल्या प्रकृती व आजारानुसार करवून घ्यावे.

फायदे –

१. शरीरशुद्धी होते.

२. शरीराला ताकत मिळते.

३.अपुनर्भव चिकित्सा – या विधीमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते.

ही वमन व विरेचनबद्दल थोडक्यात माहिती होती.तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही aarogyam.ayurvedic.clinic@gmail.com वर आमच्याशी संपर्क साधू शकतात.

पुढील ब्लॉग मध्ये आपण बस्ती कर्माबद्दल माहिती करून घेऊया .

]]>
मूळव्याधीवर घरगुती उपाय (Marathi Blog No – 02) – Blog – 53 https://aayuttam.com/blog/%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af-marathi/ Fri, 28 Jun 2024 09:41:45 +0000 https://aarogyamayurvedicclinic.com/?p=3845 मागच्या ब्लॉग मध्ये आपण ‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ हा विषय जाणून घेतला.ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार होतात. त्यापैकी मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक आणि खूप वेदनायुक्त आजार आहे.

आजचा आपला विषय आहे  – मूळव्याध

पहिले जाणून घेऊया मूळव्याध हा आजार कोणाला जास्त संभवतो?

जे लोक अधिक प्रमाणात मांसाहार, तिखट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांचे सेवन करतात आणि ज्यांना मलबद्धतेचा त्रास असतो त्या लोकांना हा आजार जास्त संभवतो.

मूळव्याध होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

१. मलबद्धता होऊ न देणे.
२. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आरोग्य मंत्राचे पालन करावे.

‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ आहे

पांढरे, गोड, पानीयुक्त, नारळयुक्त आणि उकडलेल्या पदार्थाचे उन्हाळ्यात अधिक सेवन करावे.

१. पांढरा रंग हा पित्तशामक आहे. तो शीतता प्रदान करतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे पदार्थ हे शरीरातले पित्त संतुलित ठेवतात म्हणून पांढऱ्या रंगाचे पदार्थ अधिक खावेत जसे दूध, दूधाचे पदार्थ, तूप, लोणी, ताक. उन्हाळ्यात जेवणामधे ताकाचे खूप जास्त प्रमाणात सेवन करावे कारण ताक मूळव्याधीवर खूप गुणकारी आहे.

२.पांढऱ्या रंगाची फळे ही पित्त शमन करतात आणि पोट सुध्दा साफ ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाच्या फळांचे अधिक सेवन करावे जसे पेरू, सफरचंद, केळी, पिअर आदि

३) हिरवी मिरची, आले, लसूण आणि मिरे हे जेवणात टाळावे. उन्हाळ्यात हिरवी मिरची कच्च्या स्वरूपात अधिक प्रमाणात खाण्यात आली जसे चटणी, पाणीपुरी मधे तर मूळव्याधीतून रक्‍त पडायला सुरुवात होते.

मूळव्याधीतून पडणारे रक्त कसे थांबवावे?

मूळव्याधीतून पडणारे रक्त थांबवण्यासाठी कांदा सालीसोबत गॅस वर भाजावा नंतर साल काढून नुस्ता कांद्याचे सेवन करावे किंवा कांद्याचे दहीसोबत सेवन करावे. या उपायाने मूळव्याधीतून पडणारे रक्त लगेचच थांबते.

मूळव्याध झाल्यावर काय पथ्य करावे?

१) हिरवी मिरची, आले, लसूण, मिरे यांचे सेवन पूर्णतः बंद करावे.
२) जेवणामध्ये ताकाचे प्रमाण अधिक वाढावावे.
३) आठवड्यातून २-३ वेळा सुरणाच्या भाजीचे सेवन करावे.

सुरणाची भाजी बनवण्याच्या आधी सुरण कापून ते ताकामध्ये भिजत टाकावे त्यामुळे सुरणातले क्षार ताकामध्ये विरघळतात. क्षारासोबत सुरणाच्या भाजीचे सेवन केले तर जीभ , घशाला खाज सुटणे,मुतखडा, संधिवात यासारखे आजार होण्याची संभावना असते.

जर मूळव्याधी बरोबर आपल्याला मलबद्धता असेल तर जेवणाआधी गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा तूप किंवा एक चमचा बदाम तेल मिसळून त्याचे सेवन करावे. याने मलबद्धता जाते, गॅसेस कमी होतात आणि मूळव्याधीच्या ठिकाणी असलेली रुक्षता व आग कमी होते.

तसेच रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा त्रिफळा चूर्ण किंवा एक त्रिफळा गोळीचे उपाशीपोटी गरम पाण्यासोबत सेवन करावे.

या सर्व उपायांनी मूळव्याधीच्या त्रासापासून तुम्हाला उपशय जरूर मिळेल.

तरीही एकदा वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि आयुर्वेदाच्या पंचकर्मामधील ‘क्षारसूत्र’ या विधीमुळे मूळव्याध हा मुळातून काढता येतो त्याचा उपयोग जरूर करून घ्या.

उन्हाळ्यातील विविध आजारांपासून वाचण्यासाठी ‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ याचे पालन करा .

Stay Healthy Stay Blessed

]]>
ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र (Marathi Blog No – 01) Blog – 52 https://aayuttam.com/blog/%e0%a4%91%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-marathi-blog-no/ Fri, 21 Jun 2024 06:24:01 +0000 https://aarogyamayurvedicclinic.com/?p=3833 ऑक्टोबर सुरू झाला………. गरमी सुरू झाली आणि त्यासोबत सुरू झाले गरमीचे सर्व आजार जसे घामोळ्या, नाकातून रक्त येणे, पोटदुखी, डोकेदुखी, माइग्रेन , मूलव्याधि आदि

या आजारांपासून आपण कसे वाचू शकतो?

सणांच्या मदतीने.

ते कसे? चला जाणून घेऊया.

प्रत्येक सण, परंपरा या धार्मिक गोष्टिंच्या मागे शास्त्र असते. लोकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आपल्या ऋषिंनी शास्त्र आणि धर्माची सांगड घातली आणि शास्रांचे सिद्धान्त धर्माबरोबर बसवले जेणेकरून सर्व जणांनी धर्माचे पालन केले तर शास्त्राचे पालन होईल आणि समाजातील सर्व लोक निरोगी राहतील .

सण सुद्धा कधीही येत नाहीत. सण शास्त्रीय दृष्टीने बसवलेले असतात.

सण ऋतुंच्या संधीला येतात. जसे उन्हाळ्याच्या आधी गणपती, हिवाळ्याच्या आधी दिवाळी. सण आपल्याला शिकवतात की पुढे येणाऱ्या ऋतुमध्ये आहार-विहार मध्ये काय बदल केल्याने आपण निरोगी राहू शकतो.

ते कसे ते जाणन्यासाठी सणांच्या मागील शास्त्र समजून घेऊया .

ऑक्टोबरच्या आधी गणपती सण येतो. आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा.

आपण कधी विचार केला आहे का कि गणपती चकली, चिवडा का नाही खात?

कारण गणपती नंतर ऑक्टोबर ची गरमी येणार असते. ऑक्टोबर ऋतूमध्ये निरोगी राहाण्यासाठी जे योग्य आहार ते आपण गणपतीला प्रसाद म्हणून चढवतो. म्हणजे प्रत्येक सणाला सांगितलेला आहार विहार हा आपल्याला प्रतिकात्मक सांगतो की येणाऱ्या ऋतुमधे आहार विहारामधे काय बदल केल्याने आपण निरोगी राहू शकतो.ऑक्टोबरमध्ये खुप गरमी असते त्यामुळे गणपतीला प्रसाद म्हणून असे पदार्थ चढवतात जे उन्हाळ्यात आपल्याला निरोगी ठेवतील. मोदक प्रतीकात्मक सांगतो की उकडलेले पदार्थ खा म्हणजे उन्हाळ्यात तहान तहान होणार नाही , पित्त संतुलित राहिल , गरमीचे आजार होणार नाहीत. म्हणून गणपति चकली , चिवड़ा नाही खात.

ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र आहे.

पांढरे, गोड, उकडलेले, नारळयुक्त आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करावे.

१) ऑक्टोबर मध्ये पित्त खूप भडकते आणि पांढऱ्या रंगांचे पदार्थ पित्त कमी करतात. त्यामुळे त्यांचे अधिक सेवन करावे.

  • पांढऱ्या रंगाचे पदार्थ जसे ताक, दूध, दुधाचे पदार्थ, दही, कढी, तांदूळ, नारळ
  • पांढऱ्या रंगांची फळे जसे सीताफळ, पेरू, केळी, पेअर, सफरचंद आदि

२) मधुर रस पित्त शामक असतो म्हणजे पित्त कमी करतो म्हणून ह्या ऋतुमधे गोड़ पदार्थ खावेत.

३) ऑक्टोबर मध्ये गर्मी खूप असते. ह्या गरमीमध्ये जर आपण तळलेले पदार्थ खाल्ले तर पित्त वाढते आणि तहान लागते. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये उकडलेल्या पदार्थांचे सेवन जास्त करावे.

४) जेवणामध्ये नारळाचा उपयोग जास्त करावा. नारळ पांढरा रंगाचा, गोड आणि पाणीयुक्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचा जेवणात अधिक प्रमाणात उपयोग केला तर पित्त संतुलित रहाते आणि शरीर निरोगी राहते. जसे नारळाचे वाटप, नारळाचे दूध, नारळाचे पाणी,नारळाचा खीस आदि

५) या ऋतूत गुणाने थंड असलेले पेय यांचे अधिक सेवन करावेत. कारण ऑक्टोबरच्या गरमी मुळे शरीरातून घामाद्वारे पाणी आणि क्षार अधिक प्रमाणात बाहेर निघुन जातात त्यामुळे शरीरातील पानी आणि इलेक्ट्रोलाइट चे संतुलन ठेवण्यासाठी विविध प्रकारचे सरबत थोडे मीठ घालून सेवन करावेत जसे खसबसरबत, सोलकढी , लिम्बु सरबत , उसाचा रस यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.

अशा रीतीने शास्त्रीयदृष्ट्या आपण सणांचे पालन केले तर प्रत्येक ऋतूत आपण निरोगी राहू.

आश्चर्यचकित झालात ना ऐकून की सणाच्यामागे सुद्धा एवढा शास्त्रीय विचार आहे. तर चला मग प्रत्येक सणाकडे आज पासून डोळसपणे बघूया.

प्रत्येक ऋतुच्या आरोग्य मंत्राचे पालन करूया. त्याची सुरुवात ह्या ऑक्टोबर पासून ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र पालुन करूया.

Stay Healthy Stay Blessed.

]]>