ऑक्टोबर सुरू झाला………. गरमी सुरू झाली आणि त्यासोबत सुरू झाले गरमीचे सर्व आजार जसे घामोळ्या, नाकातून रक्त येणे, पोटदुखी, डोकेदुखी, माइग्रेन , मूलव्याधि आदि
या आजारांपासून आपण कसे वाचू शकतो?
सणांच्या मदतीने.
ते कसे? चला जाणून घेऊया.
प्रत्येक सण, परंपरा या धार्मिक गोष्टिंच्या मागे शास्त्र असते. लोकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आपल्या ऋषिंनी शास्त्र आणि धर्माची सांगड घातली आणि शास्रांचे सिद्धान्त धर्माबरोबर बसवले जेणेकरून सर्व जणांनी धर्माचे पालन केले तर शास्त्राचे पालन होईल आणि समाजातील सर्व लोक निरोगी राहतील .
सण सुद्धा कधीही येत नाहीत. सण शास्त्रीय दृष्टीने बसवलेले असतात.
सण ऋतुंच्या संधीला येतात. जसे उन्हाळ्याच्या आधी गणपती, हिवाळ्याच्या आधी दिवाळी. सण आपल्याला शिकवतात की पुढे येणाऱ्या ऋतुमध्ये आहार-विहार मध्ये काय बदल केल्याने आपण निरोगी राहू शकतो.
ते कसे ते जाणन्यासाठी सणांच्या मागील शास्त्र समजून घेऊया .
ऑक्टोबरच्या आधी गणपती सण येतो. आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा.
आपण कधी विचार केला आहे का कि गणपती चकली, चिवडा का नाही खात?
कारण गणपती नंतर ऑक्टोबर ची गरमी येणार असते. ऑक्टोबर ऋतूमध्ये निरोगी राहाण्यासाठी जे योग्य आहार ते आपण गणपतीला प्रसाद म्हणून चढवतो. म्हणजे प्रत्येक सणाला सांगितलेला आहार विहार हा आपल्याला प्रतिकात्मक सांगतो की येणाऱ्या ऋतुमधे आहार विहारामधे काय बदल केल्याने आपण निरोगी राहू शकतो.ऑक्टोबरमध्ये खुप गरमी असते त्यामुळे गणपतीला प्रसाद म्हणून असे पदार्थ चढवतात जे उन्हाळ्यात आपल्याला निरोगी ठेवतील. मोदक प्रतीकात्मक सांगतो की उकडलेले पदार्थ खा म्हणजे उन्हाळ्यात तहान तहान होणार नाही , पित्त संतुलित राहिल , गरमीचे आजार होणार नाहीत. म्हणून गणपति चकली , चिवड़ा नाही खात.
ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र आहे.
पांढरे, गोड, उकडलेले, नारळयुक्त आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करावे.
१) ऑक्टोबर मध्ये पित्त खूप भडकते आणि पांढऱ्या रंगांचे पदार्थ पित्त कमी करतात. त्यामुळे त्यांचे अधिक सेवन करावे.
- पांढऱ्या रंगाचे पदार्थ जसे ताक, दूध, दुधाचे पदार्थ, दही, कढी, तांदूळ, नारळ
- पांढऱ्या रंगांची फळे जसे सीताफळ, पेरू, केळी, पेअर, सफरचंद आदि
२) मधुर रस पित्त शामक असतो म्हणजे पित्त कमी करतो म्हणून ह्या ऋतुमधे गोड़ पदार्थ खावेत.
३) ऑक्टोबर मध्ये गर्मी खूप असते. ह्या गरमीमध्ये जर आपण तळलेले पदार्थ खाल्ले तर पित्त वाढते आणि तहान लागते. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये उकडलेल्या पदार्थांचे सेवन जास्त करावे.
४) जेवणामध्ये नारळाचा उपयोग जास्त करावा. नारळ पांढरा रंगाचा, गोड आणि पाणीयुक्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचा जेवणात अधिक प्रमाणात उपयोग केला तर पित्त संतुलित रहाते आणि शरीर निरोगी राहते. जसे नारळाचे वाटप, नारळाचे दूध, नारळाचे पाणी,नारळाचा खीस आदि
५) या ऋतूत गुणाने थंड असलेले पेय यांचे अधिक सेवन करावेत. कारण ऑक्टोबरच्या गरमी मुळे शरीरातून घामाद्वारे पाणी आणि क्षार अधिक प्रमाणात बाहेर निघुन जातात त्यामुळे शरीरातील पानी आणि इलेक्ट्रोलाइट चे संतुलन ठेवण्यासाठी विविध प्रकारचे सरबत थोडे मीठ घालून सेवन करावेत जसे खसबसरबत, सोलकढी , लिम्बु सरबत , उसाचा रस यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.
अशा रीतीने शास्त्रीयदृष्ट्या आपण सणांचे पालन केले तर प्रत्येक ऋतूत आपण निरोगी राहू.
आश्चर्यचकित झालात ना ऐकून की सणाच्यामागे सुद्धा एवढा शास्त्रीय विचार आहे. तर चला मग प्रत्येक सणाकडे आज पासून डोळसपणे बघूया.
प्रत्येक ऋतुच्या आरोग्य मंत्राचे पालन करूया. त्याची सुरुवात ह्या ऑक्टोबर पासून ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र पालुन करूया.
Stay Healthy Stay Blessed.